Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 अशाने मासेदोनिया व अखया येथील सर्व श्रद्धावंत ह्यांना तुम्ही आदर्श झालात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आणि म्हणूनच मासेदोनिया व अखया येथील सर्व विश्वासणार्‍यांसाठी तुम्ही आदर्श झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:7
14 Iomraidhean Croise  

आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले.


तेथून फिलिप्पै या ठिकाणी गेलो. ते मासेदोनिया ह्या प्रमुख जिल्ह्यातील शहर होते व तेथे रोमन लोकांची वसाहत होती. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.


नंतर पौल अथेनै सोडून करिंथ येथे गेला.


गल्‍लियो हा अखया प्रांताचा राज्यपाल असता, यहुदी लोकांनी एकजूट करून पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेम येथे जावे असे पौलाने आपल्या मनात ठरवून म्हटले, ‘तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.’


कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे.


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.


कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने सांगत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आहे आणि ह्या तुमच्या आवेशाने तेथील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.


मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही.


अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी.


कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.


सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे.


तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर सत्ता चालवणारे असे नव्हे, तर कळपापुढे आदर्श निर्माण करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan