Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:6
33 Iomraidhean Croise  

त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला क्रुस उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे.


येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.


ते तर येशूच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून न्यायसभेपुढून आनंदाने निघून गेले.


अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या ठिकाणच्या ख्रिस्तमंडळ्यांना स्वस्थता मिळाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती बळकट होत गेली आणि प्रभूविषयीच्या आदरभावनेत जगत असताना त्यांची वाढ होत गेली.


आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.


तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला दिलेली शिकवण तुम्ही दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.


म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.


दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे, गरीब असलो तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्‍लक असलो, तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आमची पात्रता पटवून देतो.


आम्हांला आशा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी प्रथम स्वतःचे समर्पण प्रभूला केले आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःस आमच्यासाठीदेखील वाहून घेतले.


परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा,


तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.


बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.


ह्यावरून तुम्ही सोसत असलेल्या तुमच्या सर्व छळांत व संकटांत तुम्ही जी चिकाटी व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांत आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो.


आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही,


तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा, म्हणून असे केले.


शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.


बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.


जरी तुम्हांला आत्ता काही काळ निरनिराळ्या कठीण प्रसंगांमुळे दुःख सहन करणे भाग पडत असले, तरी ह्याविषयी तुम्ही उ्रास करा.


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उ्रास करता.


तुम्ही चांगले करण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हांला कोण इजा करणार?


प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan