Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 कारण तुम्ही तुमची श्रद्धा कृतीत कशी उतरवीत आहात, तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही कसे श्रम करीत आहात आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील तुमची आशा कशी स्थिर आहे, ह्यांचे आम्ही देवपित्यासमोर निरंतर स्मरण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:3
55 Iomraidhean Croise  

माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.


जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.


‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे.


तुमची पापे माफ व्हावीत म्हणून पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे प्रभूच्या सहवासात तुम्हांलाही नवचैतन्य लाभेल


आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा.


आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी.


हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे.


मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.


बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा;


कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.


म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.


आता तीमथ्यने तुमची भेट घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जशी तुम्हांला भेटायची आम्हांला उत्कंठा आहे, तशी तुम्हांलादेखील आम्हांला भेटायची उत्कंठा आहे आणि तुम्ही आमची नेहमी प्रेमाने आठवण करता, ह्याविषयीचे आनंददायक वृत्त आम्हांला कळविले.


ह्याकरिता आम्ही तुमच्यासाठी सर्वदा प्रार्थना करतो, म्हणजे जे जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हांला आमंत्रित केले आहे, त्यासाठी तो तुम्हांला पात्र करो व तुमचा प्रत्येक चांगला मनोदय व तुमचे श्रद्धेने केलेले कार्य त्याच्या सामर्थ्याने तो पूर्णत्वास नेवो.


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाचे आभार मानावयास हवेत आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्या सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती वाढत आहे.


येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला.


हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.


तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनांनुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हांला सहनशक्तीची आवश्यकता आहे.


अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता;


तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.


म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये.


त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.


उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.


मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.


प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल, तर देवासमोर येण्याचे आपण धैर्य बाळगतो.


जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो.


देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा फार कठीण नाहीत.


तुझी कृत्ये, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुझ्या पहिल्या कार्यापेक्षा आता तुझे कार्य अधिक आहे, हे मला माहीत आहे.


धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan