Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्‍या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:10
46 Iomraidhean Croise  

तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”


मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”


परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले?


त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता.


जे लोक बाप्तिस्मा घ्यायला त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो, सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?


आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.”


कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”


परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते.


ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत.


तुम्ही जीवनाच्या अधिपतीला ठार मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले, ह्याचे आम्ही साक्षीदार आहोत.


सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याद्वारे सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे आवश्यक आहे.


तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.


व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.


तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे.


परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.


आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे.


आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.


तो त्याच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्तमंडळीचे मस्तक व उगमस्थान आहे. तो मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे;


अशाने मासेदोनिया व अखया येथील सर्व श्रद्धावंत ह्यांना तुम्ही आदर्श झालात.


यहुदीतरांचे तारण व्हावे म्हणून आम्ही संदेश देतो, त्यालाही ते मनाई करतात. त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे!


तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.


आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे.


देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,


न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल.


त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.


तुम्ही त्याच्याद्वारे विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.


ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे.


आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.


त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.


मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan