Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:7
34 Iomraidhean Croise  

म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही.


तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित चैनबाजी, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला अकस्मात गाठील.


तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व घडामोडी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”


तो त्यांना म्हणाला, “झोपलात का? तुम्ही मोहात पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”


आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा.


नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील;


बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे.


परमेश्वराचे साहाय्य मागत ह्या सर्व गोष्टी प्रार्थना करून मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ह्याकरिता जागृत राहून चिकाटी बाळगा; सर्व पवित्र जनांसाठी सातत्याने धावा करा.


तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.


प्रार्थनेत तत्पर असा व प्रार्थना करताना आभार मानत दक्ष राहा.


परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.


ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे.


आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा;


तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो युगांच्या समाप्तीस एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.


म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


पतींनो, तुम्हीही पत्नींबरोबर त्या अधिक नाजुक आहेत म्हणून सुज्ञतेने वागा, कारण तुमच्याबरोबर त्यादेखील देवाने दिलेली जीवनाची देणगी स्वीकारतील, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.


“पाहा, जसा चोर येतो, तसा मी येईन! आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे सांभाळतो तो धन्य!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan