Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ख्रिस्ती म्हणून कोणाला दुःख सहन करावे लागत असेल, तर त्याला त्याची लाज वाटू नये, तर त्याने आपण हे नाव धारण करतो म्हणून देवाचा गौरव करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दु:ख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचा गौरव करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:16
20 Iomraidhean Croise  

त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियाला आणले. त्याने तेथे वर्षभर ख्रिस्तमंडळीमध्ये मिसळून बऱ्याच लोकांना प्रबोधन केले. श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.


अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?”


तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”


ते तर येशूच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून न्यायसभेपुढून आनंदाने निघून गेले.


कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.


ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे.


जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?


यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.


शुभवर्तमान सांगणाऱ्याने देवाचा संदेश सांगावा. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत या भावनेने करावी, ह्यासाठी की, सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुगे त्याची आहेत. आमेन.


ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमचा अपमान होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवशाली आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन विसावला आहे.


म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत स्वतःला विश्‍वसनीय निर्माणकर्त्याच्या स्वाधीन करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan