Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्‍लास व आनंद कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा; म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:13
35 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल.


मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.


आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.


ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”


मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, त्या दिवशी असेच होईल.


मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते.


ते तर येशूच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून न्यायसभेपुढून आनंदाने निघून गेले.


इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,


आणि जर मुले तर वारस, म्हणजे देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारस आहोत; कारण आपण जर ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी झालो तर आपल्याला त्याच्या वैभवातदेखील सहभाग मिळेल.


आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो.


कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते.


तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात.


आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते.


आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.


माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे.


तुमच्यासाठी माझ्या दुःखांमध्ये मी आनंद मानतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे, ते मी माझ्या देहाने, त्याचे शरीर म्हणजे ख्रिस्तमंडळीसाठी भरून काढत आहे.


जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील.


म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे.


ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो:


आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या वैभवशाली सान्निध्यात निर्दोष असे उ्रासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.


देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan