Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:18
34 Iomraidhean Croise  

तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’


आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गदारोळ होत आहे, असे पाहून पिलातने पाणी घेतले व लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या मनुष्याच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”


नीतिमत्वाविषयी, कारण मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही


तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे, हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान सेवकाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी.


तो पवित्र व नीतिमान होता परंतु त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी मनुष्य आम्हांला द्या अशी मागणी केली.


व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला.


तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.


आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो.


ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.


देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली.


कारण तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ उभे आहात. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नव्हे, तर आम्ही तुमच्या आनंदाकरिता तुम्हांला साहाय्य करीत आहोत.


कारण त्यास जरी दुर्बलतेत वधस्तंभावर चढविण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्याप्रमाणे दुर्बल आहोत, परंतु तुमच्याबरोबरच्या आमच्या संबंधांत आम्ही त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याने संपन्न आहोत.


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.


आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे.


ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे.


आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.


त्या देवाच्या इच्छेनुसार आपण येशू ख्रिस्ताने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.


तर सार्वकालिक आत्म्याच्यायोगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या उपासनेसाठी निरुपयोगी विधींपासून किती अधिक प्रमाणात शुद्ध करील?


तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो युगांच्या समाप्तीस एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.


त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.


निर्दोष लोकांना तुम्ही दोषी ठरविले, त्यांचा घात केला. ते तुम्हांला विरोध करत नाहीत.


त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली.


ख्रिस्ताने दैहिक दुःख सोसले. तुम्हीही तीच मनोवृत्ती धारण करा, कारण जो दैहिक दुःख सहन करतो, तो पापाकडे पाठ फिरवतो!


म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे.


मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan