Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 परंतु नीतिमत्वामुळे तुम्हांला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. कुणाला भिऊ नका व चिंता करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:14
29 Iomraidhean Croise  

जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा.


म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे!


जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल.


जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील.


तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्‍वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल.


येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे,


कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.


“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका.


माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.”


ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.


कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.


जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल.


पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता, तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हांला दिसून आले.


ज्याप्रमाणे सारा अब्राहामची पत्नी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, त्याप्रमाणे तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही गोष्टीचे भय न बाळगल्यास, तुम्ही तिची मुले आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan