Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 2:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 त्याचा अपमान होत असता, त्याने उलट अपमान केला नाही, दुःख भोगत असता, त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यावर भिस्त ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 2:23
32 Iomraidhean Croise  

आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अपराध केला नाही.”


मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला.


त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही.


कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”


तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा


ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”


दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते.


परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?


मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या. तुमचा व त्यांचा मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही, या सत्याची आठवण ठेवा.


हा सर्व देवाच्या यथार्थ न्यायाचा पुरावा आहे. तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही पात्र ठरावे.


ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.


वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.


म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत स्वतःला विश्‍वसनीय निर्माणकर्त्याच्या स्वाधीन करावे.


त्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करतो व लढतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan