Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाचे अज्ञान दूर करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 2:15
23 Iomraidhean Croise  

त्यांत पाच मूर्ख व पाच शहाण्या होत्या.


उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो.


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


अहो गलतीयातील बुध्दिहीन लोकांनो, क्रुसावर चढविलेल्या येशू ख्रिस्ताचे स्पष्ट वर्णन तुमच्यापुढे असता तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?


देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे.


सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.


जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली.


टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.


यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.


तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल.


चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.


म्हणून तुम्ही आपले ऐहिक आयुष्य मानवी वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan