Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 जरी तुम्हांला आत्ता काही काळ निरनिराळ्या कठीण प्रसंगांमुळे दुःख सहन करणे भाग पडत असले, तरी ह्याविषयी तुम्ही उ्रास करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याविषयी तुम्ही उल्लास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याविषयी तुम्ही खूप उल्लास करता, तरी आता थोडा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग पडत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:6
47 Iomraidhean Croise  

अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला.


आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.


व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे,


तथापि भुते तुम्हांला वश होतात, ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, यात धन्यता माना.”


परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो:


ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.


तुम्हांला माझ्या ठायी शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा. मी जगावर विजय मिळवला आहे.”


शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.”


आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा.


इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये अभिमान बाळगतो.


आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो.


मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात.


आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.


दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे, गरीब असलो तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्‍लक असलो, तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आमची पात्रता पटवून देतो.


परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा,


तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती.


आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.


प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.


तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात.


माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना;


प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा


दुःख धरा, रडा व शोक करा; तुमच्या हसण्याचे रडण्यात व तुमच्या आनंदाचे खिन्नतेत परिवर्तन होवो!


चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.


आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan