Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तुम्हांला तारणासाठी श्रद्धेद्वारे देवाच्या सामर्थ्याने सुरक्षित राखण्यात आले आहे. हे तारण शेवटच्या काळी प्रकट होणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरिता विश्वासाद्वारे परमेश्वराच्या शक्तीने तुम्ही सुरक्षित ठेवलेले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:5
43 Iomraidhean Croise  

जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा कोणी तरी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील.


तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो.


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या ठायी शाश्‍वत जीवन देणाऱ्या पाण्याचा उसळता झरा होईल.”


मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे.


ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा.


आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो.


जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.


कारण तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ उभे आहात. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नव्हे, तर आम्ही तुमच्या आनंदाकरिता तुम्हांला साहाय्य करीत आहोत.


मला ख्रिस्ताबरोबर क्रुसावर चढविण्यात आले आहे आणि त्यामुळे ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे माझे जीवन आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता अर्पण केले.


देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे.


ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वसती करावी. ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे,


ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.


म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.


त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.


म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्यायोगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे ठरतात त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे व्हावे.


त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.


म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्‍लास व आनंद कराल.


ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो:


ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल.


देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या वैभवशाली सान्निध्यात निर्दोष असे उ्रासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan