Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:22
51 Iomraidhean Croise  

तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.


मी तुम्हांला जे वचन सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.


सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे.


आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो.


त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.


अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.


त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील.


जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कृत्ये ठार मारलीत तर जगाल.


तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, धीराने, चांगुलपणात, पवित्र वृत्तीने, खऱ्या प्रीतीने,


अहो गलतीयातील बुध्दिहीन लोकांनो, क्रुसावर चढविलेल्या येशू ख्रिस्ताचे स्पष्ट वर्णन तुमच्यापुढे असता तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?


आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत.


तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले?


आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.


माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.


जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो.


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाचे आभार मानावयास हवेत आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्या सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती वाढत आहे.


बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे


ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी.


कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.


युवकांना बंधूसमान मानून, वडीलधाऱ्या स्त्रियांस मातेसमान मानून व तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर.


तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ.


अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला.


ख्रिस्ती बंधुभगिनी म्हणून प्रीतीत टिकून राहा.


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला,


तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


तर सार्वकालिक आत्म्याच्यायोगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या उपासनेसाठी निरुपयोगी विधींपासून किती अधिक प्रमाणात शुद्ध करील?


म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे तुमच्या अंतःकरणात असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात स्वच्छ करा, अहो, ढोंगी लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.


स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.


हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता, त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले होते.


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा.


देवाच्या प्रजेपासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे, तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या शुभवर्तमानाचा अवमान करणाऱ्याबरोबर त्याचा शेवट कसा होईल?


मुख्यतः एकमेकांवर आस्थेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते.


धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.


जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.


त्याची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.


देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे.


“मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.


प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो.


परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan