Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:20
27 Iomraidhean Croise  

मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.


तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले,


त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.


कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले आहे.


परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील.


आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले.


व ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवामध्ये युगादिकालापासून गुप्त ठेवलेल्या रहस्याची व्यवस्था कशी होणार आहे, हे सर्वांना प्रकट करून दाखवावे.


जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र लोकांकरता ते प्रकट झाले आहे. ते हे वचन होय.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले.


ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे


तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो युगांच्या समाप्तीस एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.


देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.


तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही.


पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan