Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:13
35 Iomraidhean Croise  

तो त्यांना म्हणाला, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ म्हणून ते गेले.


लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे.


मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, त्या दिवशी असेच होईल.


किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय?


दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.


सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.


परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.


सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.


आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा,


तुमचे खरे जीवन ख्रिस्त आहे आणि तो जेव्हा प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर वैभवाने प्रकट केले जाल!


प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल.


परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


म्हणून आपला आत्मविश्‍वास सोडू नका, त्याचे फळ मोठे आहे.


ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आपल्या आशेसंबंधी धैर्य व आत्मविश्वास यांमध्ये पारपर्यंत टिकून राहिल्यास आपण देवाचे घर आहोत.


आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे.


त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.


ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.


ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.


जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan