Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हांला शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी पाहण्याची उत्कंठा देवदूतांनादेखील आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हांला सुवार्ता सांगणार्‍यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वत:साठी नव्हे, तर तुमच्यासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:12
56 Iomraidhean Croise  

एकदा येशूने अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना उघड करून दाखवल्या आहेत.


माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा.


त्याचप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद केला जातो, हे मी तुम्हांला सांगतो.”


‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.


ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले.


कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल


पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला.


त्याला असा दृष्टान्त झाल्यावर त्या लोकांना शुभवर्तमान सांगावयास देवाने आम्हांला बोलावले आहे, असे समजून आम्ही मासेदोनियात जाण्याचा निर्णय लगेच घेतला.


देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे.


त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.


तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो,


तेथे त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन जाहीर केल्यावर ते यरुशलेम नगरास परत आले, येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांत शुभवर्तमान घोषित केले.


म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.


त्यात परमेश्वर स्वतःबरोबरचे माणसाचे संबंध कसे यथोचित करतो, ते दाखविले आहे. ते सुरुवातीपासून श्रद्धेने होत असते. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’


घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे.


परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो.


त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे.


तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, धीराने, चांगुलपणात, पवित्र वृत्तीने, खऱ्या प्रीतीने,


कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे.


ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.


बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले.


त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुत कृत्ये व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची वरदाने वाटून साक्ष दिली.


कारण त्यांच्यासारखे आपल्यालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारले नाही.


परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय.


म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे.


तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan