Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्या प्रांतांत हद्दपार केलेल्या, देवाच्या निवडलेल्या लोकांना:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून, पंत, गलातीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात हद्दपार होऊन विखुरलेल्या आणि परमेश्वराच्या निवडलेल्यांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:1
34 Iomraidhean Croise  

त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,


ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.


येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते.


तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता.


ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय?


तेव्हा पंथ येथील अक्‍विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्‍ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला.


तेथे काही दिवस राहून तो तेथून निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया व फ्रुगिया प्रदेशांतील सर्व शिष्यांना प्रोत्साहन देत फिरला.


असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.


मात्र लिबिर्तिन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघातील लोकांच्या प्रार्थनामंदिरातील काही जण तसेच कुरेनेकर आणि आलेक्सांद्रिया येथील काही यहुदी लोक ह्यांनी त्याला विरोध केला. हे लोक व किलिकिया व आसिया या प्रदेशातील यहुदी लोक स्तेफनबरोबर वितंडवाद घालू लागले.


ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले.


आशियातल्या ख्रिस्तमंडळ्यांच्या तुम्हांला शुभेच्छा आहेत. अक्‍विला, प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती, तुम्हांला प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा देत आहे.


बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. कारण तिथे आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. इतके की, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली.


तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता.


तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात.


जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत.


हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले.


बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा.


प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan