Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आपण देवाचे आहोत; जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो; जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 4:6
33 Iomraidhean Croise  

माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे, हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी इतर मेंढरे आहेत. तीदेखील मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.


त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी ज्याला पाठवतो, त्याचा जो स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.”


जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील.


कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल


तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील.


तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.”


येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.”


ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “तुमचा पिता कुठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”


येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात परंतु मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात परंतु मी ह्या जगाचा नाही.


ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:


धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.


कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे, असे त्याने समजावे.


तुम्ही बाह्य स्वरूप तेवढे पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत, असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील.


पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.


ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू आणि तारणारा ह्याने प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.


प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.


मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.


जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.


सगळे जग त्या दुष्टाला वश झालेले असले, तरीही आपण देवापासून आहोत, हे आपल्याला ठाऊक आहे.


परंतु प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan