Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 4:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 4:2
9 Iomraidhean Croise  

ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.


तिच्या मालकाने तिला आपली पत्नी करून घेण्याचे ठरवले असेल, पण पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंडणी घेऊन तिची मुक्तता करावी. तिला परक्या लोकांस विकण्याचा त्यास अधिकार नाही. तिच्याशी कपटाने वागल्यामुळे तिला विकण्याचा त्यास अधिकार नाही.


तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.


वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.


आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले.


त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.”


आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात.


तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan