Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसांत बेथलेहेम-यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:1
26 Iomraidhean Croise  

त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसर देशामध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता.


अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला.


कनान देशात दुष्काळ फारच तीव्र पडला होता.


दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”


तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.


बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.


सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.


त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.


आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.


परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले:


मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन.


कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.


मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.


“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.


पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.


तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.


मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.


तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.


नंतर तो मनुष्य यहूदातल्या बेथलेहेम नगरातून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan