Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या धुरातून ‘टोळ निघून पृथ्वीवर’ उतरले; त्यांना पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:3
16 Iomraidhean Croise  

माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”


माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”


तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”


टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील.


त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.


कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.


मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.


तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.


तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही.


पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.


विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.


त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती.


टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते.


तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan