प्रकटी 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. “‘पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ,’ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.” Faic an caibideil |