Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 4:5
24 Iomraidhean Croise  

परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”


सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.


हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.


तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.


लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.


मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.


त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.


ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.


परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.


मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.


तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.


मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे.


आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.


आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.


तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.


सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.


राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.


तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan