Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 (तुझी कृत्ये,) तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे (तरी तू धनवान आहेस) आणि जे यहूदी नसताही स्वतःला यहूदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 2:9
29 Iomraidhean Croise  

येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’”


जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”


आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.


“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी


मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.


माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”


आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”


अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.


आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,


आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस;


आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,


ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?


पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,


आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.


ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे.


जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.


चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे.


मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.


मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.


तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.


पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्यास सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात, त्या गोष्टी ज्यांना माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.


पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.


मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan