Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 स्वर्गात दुसरे एक रहस्यमय दृश्य दिसले ते हे: पाहा, एक मोठा तांबूस अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:3
27 Iomraidhean Croise  

त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.


परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो. ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय?


नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.


जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिले.


जशी पायांची बोटे अंशत: लोखंडाची आणि अंशत: मातीची बनली होती तसे ते राज्य असेल अंशत: बळकट आणि अंशत: ठिसूळ असे होईल.


मला त्याची दहा शिंगे आणि त्याचे गुढ जाणायचे होते जी त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यामध्ये आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्यांचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शविली.


आता दहा शिंगाविषयी या राज्यातून दहा राजांचा उदय होईल; आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील.


आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.


आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.


तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;


त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.


आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.


तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.


आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.


आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला.


आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?”


यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.


आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले.


आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.


आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील.


तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो.


त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.


आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्यास बांधले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan