Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 11:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 11:2
32 Iomraidhean Croise  

हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.


कारण ते स्वत:ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर


आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.


सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर, यरूशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.


तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.


जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.


त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.


मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्रजनांच्या बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले.


नंतर मला त्या चौथ्या श्वापदा विषयी बोलण्याची इच्छा झाली, जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दात लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळेची होती, ते चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे पायाखाली तूकडे करी.


तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल, आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.


त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.


नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”


तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तीनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”


तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.


ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले.


मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.


तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.


ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.


तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?


आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले.


आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”


आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.


तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.


आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती;


आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan