Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, जो सर्वसमर्थ तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 जो आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहे तो म्हणतो, “मी आदी व अंत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:8
29 Iomraidhean Croise  

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.


सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.


देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.


“त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”


मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.


कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.


देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.”


मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो.


ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.


परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही.


इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे; आणि माझ्याशिवाय कोणी देव नाही.


याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे.


कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.


जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.


आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’


ती म्हणाली, “तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदीकिया या सात शहरातील मंडळ्यांना पाठव.”


मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.


हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.


देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.


कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत.


वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.


आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील.


आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे.


स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो


आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत.


आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन.


मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.


त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. “‘पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ,’ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan