Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 4:9
36 Iomraidhean Croise  

भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.


योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे.


“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”


आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”


मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.


“तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?


आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”


या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.


मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.


त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”


आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”


आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.


आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.


म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.


कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.


यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.


शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.


मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.


बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.


म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.


तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;


बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;


आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.


तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.


प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.


वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.


म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.


आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan