Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 3:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 3:19
52 Iomraidhean Croise  

परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात.


हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.


पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.


खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.


तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही.


जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.


तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”


जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.


“परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे, आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कारयुक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे.


परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”


मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.


आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.


त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांस मान देत नाही,


कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;


आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे.


तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?


आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हास त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.


तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना?


आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत.


म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.


कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात.


कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.


वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;


तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.


ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.


मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;


मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा.


विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;


आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.


पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.


त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात.


आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे, नैसर्गिकरीत्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात.


ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनांप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते फुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात.


कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.


तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.


मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले;


पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”


परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”


तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?


Lean sinn:

Sanasan


Sanasan