Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 तो खरोखर अत्यवस्थ झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली. ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 2:27
23 Iomraidhean Croise  

याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.”


सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.


नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.


याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर पाठवून अचूक मापदंडांनी त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो.


माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे. तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस. कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.


जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.


परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.


तू म्हणालास, मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कण्हण्याने मी थकलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मला विश्रांती मिळत नाही.


माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.


परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.


जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.


जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.


म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.


कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;


म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.


कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan