Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 1:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 1:22
14 Iomraidhean Croise  

अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”


परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.


खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.


मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”


तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे,


बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.


देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,


कारण, आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.


कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;


तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.


कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून,


म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan