Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 6:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग परमेश्वराला वाहून घेतलेले आपले सर्व दिवस त्याने पुन्हा पाळावेत. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा; तरीपण त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 6:12
12 Iomraidhean Croise  

तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा.


जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.


मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.


आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.


त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.


मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.


मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.


पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.


येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.


कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.


आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan