Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 32:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 32:1
30 Iomraidhean Croise  

आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.


आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक होते.


लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”


ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”


यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)


तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.


हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले.


त्यांच्या सोबत लोकांचा मिश्र समुदाय गेला. तसेच पुष्कळ कळप, गुरेढोरे, जनावरे होती.


कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.


हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे.


“मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानावर चरेल. नंतर तो एफ्राईम व गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल.”


गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.


म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.


मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांस पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले.


म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.


आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील.


अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.


अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,


स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”


आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.


त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले.


मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले.


कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.


खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan