गणना 24:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!” Faic an caibideil |
परमेश्वराने मला हे सांगितले आहे, “जसा एखादा सिंह, तरुण सिंह, आपल्या फाडलेल्या भक्ष्यावर गुरगुरतात,” जेव्हा मेंढपाळांचा गट बोलावून त्यांच्याविरुद्ध आणला असताही, त्यांच्या आवाजाने भयभीत होत नाही, किंवा त्यांच्या गोंगाटाने दबकत नाहीत; तसा सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर, त्याच्या टेकडीवर लढाई करण्यास उतरेल.