Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांच्या पोहर्‍यातून पाणी वाहेल; त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:7
29 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.


नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.


हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याने आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले कारण त्याने ऐकले होते की, शलमोनाचा अभिषेक होऊन त्याच्या वडिलांच्या जागेवर राजा झाला आहे, त्याचे दाविदाशी सख्य होते.


तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.


यरूशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदीपलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत.


या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले.


मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील.


मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.


खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;


आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.


शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.


आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.


जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.


त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात, तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे.


त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.


नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”


नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”


मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.


मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.


आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत.


त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan