Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, बौराचा मुलगा बलाम, ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:3
9 Iomraidhean Croise  

तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”


इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.


ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला


नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.


बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,


नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर.


बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.


हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.


जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan