Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मवाबी वडील आणि मिद्यानी वडील बलामाशी बोलावयास गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:7
15 Iomraidhean Croise  

तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.


त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.


खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.


वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळजावरुन तो तपासणी करेल.


तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”


बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हास सांगेन.” मवाबाचे पुढारी त्या रात्री बलामाबरोबर राहिले.


याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले!


इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.


कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;


त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.


आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.


ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan