Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तर आता ये, मी तुला विनंती करतो, तू या लोकांस माझ्यासाठी शाप दे. कारण ते माझ्यापेक्षा खूप भारी आहेत. कदाचित मी त्यांना मारावयास समर्थ होऊन देशातून घालवून टाकील. कारण मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्यास आशीर्वाद मिळतो. आणि जर एखाद्यास शाप दिलास तर त्यास शाप लागतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:6
23 Iomraidhean Croise  

जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.”


लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”


हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”


तेव्हा इस्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ-गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल.”


इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”


या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.


जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.


जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही.


लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.


माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”


पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत.


मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशील ते मी करीन परंतु तू ये व माझ्यासाठी या लोकांस शाप दे.


नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे.


नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल.


तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.


मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.


कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.


नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले.


तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan