Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “दर्शनमंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्राएल लोकांनी आपापल्या निशाणाजवळ व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजाजवळ आपले डेरे द्यावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 2:2
23 Iomraidhean Croise  

तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत; त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.


परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.


अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”


अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.


तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.


आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्यास मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील.


लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.


पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.


त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.


त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.


दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.


परमेश्वर, मोशे व अहरोन यांच्याशी पुन्हा बोलला, तो म्हणाला,


पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.


यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.


बलामाने रानाकडे पाहिले आणि त्यास इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.


कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.


तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.


सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.


असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.


पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan