गणना 18:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पाहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्राएल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत, तो तुमचा निरंतरचा हक्क होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे. Faic an caibideil |
आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;