Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पवित्रस्थानाचे व वेदीसंबंधीचे कर्तव्य तुम्हीच करावे म्हणजे इस्राएल लोकांवर पुन्हा कोप होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:5
25 Iomraidhean Croise  

हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.


ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.


दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.


शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.


परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.


लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे.


अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.


यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणि विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.” कारण यरूशलेमेतल्या संदेष्ट्यांकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे.


आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाचे वंशज माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.


मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;


अहरोनाने दर्शनमंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.


परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”


लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.


परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.


नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.


ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये.


तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका;


अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.


“अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”


तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.


तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.


देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.


तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan