Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 17:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्यास दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 दुसर्‍या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 17:8
13 Iomraidhean Croise  

द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.


परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.


(स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.


त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.


मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.


पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.


तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.


मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा मनुष्य आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या मनुष्यास त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या मनुष्याची निवड करील आणि त्यास स्वत: जवळ आणिल.


खरा याजक म्हणून मी एका मनुष्याची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”


म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.


त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan