Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यज्ञ करणार्‍याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:4
21 Iomraidhean Croise  

या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरूशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर.


कुटून काढलेल्या पाव हिन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे.


आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.


आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.


त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय.


आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;


जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;


त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे अन्नार्पण होय.


तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन द्राक्षरस अर्पावा.


जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.


हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;


“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.


एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.


चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे याव्यतिरिक्त परमेश्वरास मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे.


त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.


ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.


आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.


तेव्हा जैतूनाने त्यांना म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व मनुष्याचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan