Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा लोकांनी मोशेकडे ओरड केली, तेव्हा अग्नी शमला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:2
23 Iomraidhean Croise  

म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.


मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.


मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”


परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.


म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”


ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.


अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको.


म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर.


लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.


शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.


म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे.


म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.


जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan