गणना 11:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सर्व कुटुंबांतील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले; व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला; मोशेलाही वाईट वाटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला. Faic an caibideil |
म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे. डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत. हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.