Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:53
26 Iomraidhean Croise  

ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.


“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.


परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.


यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणि विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.” कारण यरूशलेमेतल्या संदेष्ट्यांकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे.


भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”


मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;


लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.


परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.


नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.


तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?


मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.


त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक मनुष्याने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ रहावे.


गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.


कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली.


अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.


मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवासमंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.


“नंतर इस्राएल लोकांस मिळालेल्या हिश्श्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे.”


आणि इस्राएलाच्या वंशाच्या अर्ध्या भागातून, मनुष्यातून व जनावरांतून प्रत्येक पन्नास वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यामध्ये पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवासमंडपाची काळजी घेतली.


अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.


वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.


मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan