Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:2
16 Iomraidhean Croise  

तेव्हा इस्राएल लोक मिसर देशामधून निघून रामसेस शहरापासून प्रवास करीत सुक्कोथ नगरास गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.


“तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा;


मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.


वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.


आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.


परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.


शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan