Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 9:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्‍यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 9:1
32 Iomraidhean Croise  

सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.


देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.


“मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.


आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव.


मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.


अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”


तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.


आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.


तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”


यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.


जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.


परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”


रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल.


त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.


तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.


आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;


आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.


आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा.


मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते; आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांना आशीर्वाद दिला.


पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे.


मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;


अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.


इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.


याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.


इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan