Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर; मात्र त्यातील लूट व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या मागे सैन्याला दबा धरून बसव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यरीहो शहर आणि त्याच्या राजाचे तू केलेस तसेच आय शहर आणि त्याच्या राजाचे कर; परंतु यावेळी हाती लागेल ती लूट व गुरे तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकाल. शहराच्या मागील बाजूस तुझ्या लोकांना दबा धरून बसव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 8:2
27 Iomraidhean Croise  

पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.


लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.


खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.


चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.


विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.


अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल.


बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे.


तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.


पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.


परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.


यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.


त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.


या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.


त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.


त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले.


आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहीत नव्हते.


त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्या सैन्याने वेगाने धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.


ज्या मोकळ्या रानात त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता तेथे इस्राएलांनी आय नगराच्या रहिवाश्यांचा संहार केला आणि त्यांनी त्या सर्वांचा तलवारीच्या धारेने नाश केला. मग इस्राएल लोक आय नगरात परत आले. त्यावर त्यांनी तलवारीच्या धारेने हल्ला केला.


त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले.


मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.


तुम्ही ते नगर काबीज करताच त्यास आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे पालन करा; पाहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे.”


मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.


यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan